
मटण मार्केटप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माजी स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम यांनी मागितली दाद.
चिपळूण येथे नगर परिषदेतर्फे नव्याने सुरु होत असलेल्या मटण-मासळी मार्केट प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण व मानवी आरोग्यास उद्भवणार्या संभाव्य धोक्याबाबत माजी स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम यांनी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक त्या बाबींची पूर्तता केल्याशिवाय हा प्रकल्प सुरु करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुख्याधिकारी यांनी वृत्तपत्रामध्ये जाहीर के ल्यानुसार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दुतर्फा बाहाणार्या वाशिष्ठी नदी किनार्यालगत नवीन बांधकाम झालेल्या मटण-मच्छी मार्केट इमारतीमध्ये लवकरच लिलाव प्रक्रियेद्वारे कत्तलखाना सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्या इमारतीमध्ये मटण-मच्छी व्यवसाय करावयाचा आहे, ती इमारत वाशिष्ठी नदी किनार्यालगत असून किंबहुना नदी पात्रातच आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. नगर पालिकेच्या या इमारतीमध्ये मटण मच्छी व चिकन व्यवसाय करण्याकरिता सुमारे ५०हून अधिक दुकान गाळे उपलब्ध आहेत. लवकरच लिलाव प्रक्रि या होऊन पात्र व्यवसायिकांसाठी दुकान गाळ्यांचे वितरण होणार आहे. सदरील मटण-मच्छी मार्केट प्रकल्प इमारतीची पाहाणी केली असता या ठिकाणी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अनेक गंभीर समस्या निदर्शनास येत आहेत, असे श्री. मुकादम यांनी निवेदनात नमूद केले आहे.www.konkantoday.com