
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोंडमळा येथे दोन आराम बसमध्ये अपघात, एकावर गुन्हा.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोंडमळा-सिमेचीवाडी येथे गुरुवारी पहाटे ५.१५ वाजता दोन खासगी आराम बसमध्ये अपघात झाला. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात एका बसच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर अर्जुन कराड (३०, भिवंडी-ठाणे) हे कविता टॅव्हल्सची बस घेऊन बोरीवली ते गणपतीपुळे असे जात होते. त्यांनी बुधवारी पहाटे ५.१५ वाजता आपली बस कोंडमळा येथील ईगल कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला उभी केली असता मागून आलेल्या माणिक ट्रॅव्हल्सच्या चालकाने भरधाव वेगाने उभ्या बसला धडक दिली. यामुळे दोन्ही बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. तसेच दोन्ही बसचे नुकसान झाले. त्यामुळे कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माणिक ट्रॅव्हल्सच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com