
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव कार्यक्रमांचे भव्य आयोजन करून सरकारचे धनगर ST आरक्षण लढ्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न सुरु.
धनगर समाजाची ST आरक्षण अंमलबजावणी करण्याची मांगणी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला ST आरक्षण देण्याचा शब्द देणारे नेते मागील १० वर्षात धनगर समाजाला दिलेले वचन पूर्ण करू शकले नाहीत.
*सरकार आरक्षण बाबत धनगर समाजाला फसवतोय हे माहीत असूनही धनगर समाजाचे काही वरीष्ठ नेते सरकारमध्ये राहून सत्तेची उब घेताना धनगर समाज पाहत आहे.धनगर समाज ST आरक्षण लढ्याच्या नावाखाली धनगर समाजाने अनेक नेत्यांना मोठे करून नावलौकिक मिळवून दिला आहे परंतु याच नेत्यांना जेव्हा सत्तेची उब मिळते तेव्हा धनगर समाजाचा विसर पडतो.
सध्या धनगर समाजाचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात जयंतीचे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने विविध योजना जाहीर केल्या जात आहेत याबद्दल धनगर समाजाला निश्चितच अभिमान आहे.परंतू मागील इतिहास पाहिला तर एकाही योजनेची शासनाकडून अमल बजावणी होत नाही.उदार्णार्थ मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने धनगर वाड्या रस्त्याने जोडण्यासाठी यशवंतराव होळकर रस्ते विकास योजना जाहीर केली होती.
या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकही धनगरवाडी रस्त्याने जोडली गेली नाही.शासनाच्या योजना फक्त कागदावरच प्रसिद्ध होत असतात.त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही हे धनगर समाज सध्या ओळखून आहे.
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव कार्यक्रमांतून धनगर समाजाच्या ST आरक्षण लढ्याची धार कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे.महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून भव्य दिव्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे.माझी सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे की जेवढी ताकद आपण जयंती उत्सव कार्यक्रम करण्यासाठी लावत आहात तेवढ्याच ताकदीने आपण धनगर समाज ST आरक्षण लढ्यात सहभागी झालात तर आपल्या धनगर समाजाला शंभर टक्के ST आरक्षण मिळेल यात तीळमात्र शंका नाही आहे सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी न पडता समाजाच्या हितासाठी काय करता येईल याकडे समाज नेते व कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मला वाटते.*
*रामचंद्र बाबू आखाडे*
*जिल्हाध्यक्ष* *महाराणी अहिल्यादेवी समाज* *प्रबोधन मंच, रत्नागिरी* संपर्क नं – 9222807942