
खेड खोपी फाट्या वरवेली येथे दोन तरुणांनी गाडी अडवून गोळीबार केल्याची घटना.
खेड खोपी फाट्या वरवेली येथेदोन तरुणांनी गाडी अडवून गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. या दोन तरुणांनी गाडीच्या काचाही फोडल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.तरुणांनी कारवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. हल्ला करणाऱ्या तरुणांचा येथील पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबार झाल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चार अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
तालुक्यातील मिर्ले येथे वास्तव्यास असलेले केतन साळवी हे आपल्या ताब्यातील सेलिरिओ कारने खेड येथून खोपीच्या दिशेने जात होते. याचदरम्यान, खोपी फाट्यानजीक दोन तरुणांनी कारवर दगडफेक केली. या जीवघेण्या हल्ल्यात कारच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. घाबरलेल्या साळवी यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पूर्ववैमन्यासातून हा प्रकार घडल्याचे समजते.