
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढणार :- पालकमंत्री ना. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपदी ना. उदय सामंत ह्यांची नियुक्ती झाल्यापासून ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासकामांची अक्षरशः गंगा आणली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. ना. उदय सामंत ह्यांच्याकडे उद्योग खाते असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा उद्योगाच्या बाबतीत देखील कात टाकताना दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ना. उदय सामंत ह्यांच्या माध्यमातून कोट्यावधींची गुंतवणूक येत असून ना. उदय सामंत ह्यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उद्योग देखील येऊ घातलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या उद्योगांच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पर्यटक देखील मोठ्या संख्येने येणार असल्याने ना. उदय सामंत पर्यटनाच्या बाबतीत देखील महत्वपूर्ण निर्णय घेताना दिसत आहेत. पर्यटन वाढीसाठी ना. उदय सामंत ह्यांनी अनेक पर्यटन स्थळे विकसित केली आहेत व काही विकसित होत आहेत.
पर्यटन वाढीसाठी त्रासदायक ठरणाऱ्या एका महत्वाच्या मुद्द्यावर आता ना. उदय सामंत “ऍक्शन मोड” वर दिसत असून शहर विद्रुपीकरण करण्यामध्ये मोठा वाटा असलेली अनधिकृत व आत्यवश्यक असलेली होर्डिंग्स आता काढण्याचा निर्णय ना. उदय सामंत ह्यांनी घेतला आहे. अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग्स ही केवळ शहरच विद्रुप करत नाहीत तर पर्यटक वा शहरातील नागरिकांना देखील त्रासदायक ठरतात. तसेच अश्या होर्डिंग्स मुळे मोठ्या अपघातांचा सुद्धा फार मोठा धोका संभवतो.
ह्या सर्व बाबींचा विचार करून व भविष्यातील रत्नागिरी जिल्ह्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील सर्व ठिकाणची अनधिकृत व अनावश्यक होर्डिंग काढून टाकण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.