
मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटात भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार खोल दरीत कोसळली, महिला किरकोळ जखमी
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक भागात रस्ते निसरडे झाले आहेत आज सकाळी
मुंबईहुन गोवाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारला अपघात होऊन कार ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना मुंबई -गोवा महामार्गावरील वाकेड घाटात घडली. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वाकेड घाटातील खोल दरीत कोसळली. एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून कारमधुन एकूण चार प्रवासी प्रवास करत होते. अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की, कार चालक स्वेन मोर्जेलो (चालक, वय २१ आगाशे, विरार पश्चिम), हा आपल्या ताब्यातील कार (MH03DG2451) घेऊन मुंबईहून ३ प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता. लांजा येथील वाकेड येथील घाटात त्याचा गाडीवरील ताबा सुटला. थेट ७० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये क्लाइड डिसोजा ( ५६ मालवणी मालाड), फ्लाबिया फर्नांडिस (२६ बोरिवली वेस्ट गोराई), कु. रियोना (१८ आर्लेम गोवा) असे प्रवाशी होते. ते किरकोळ जखमी झाले.