
पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर बैठकांचा जोर रविवारी दिसून आला. मात्र, सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.आपण सोमवारपासून पाणीही पिणार नाही असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.
लवकरच आम्ही त्यांच्याकडे अंतिम प्रस्ताव घेऊन जाऊ असे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे चर्चेला रविवारी ब्रेक बसला असला तरी चर्चेची दारे उघडी असल्याचे स्पष्ट संकेत सरकारने दिले. उपसमितीचे सदस्य, महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.




