
चिपळुणातील पूर, दरडग्रस्त भागाची आमदार शेखर निकम करणार पाहाणी.
दरवर्षी पावसाळ्यात उदभवणारी पूर समस्या, तुंबणार्या नाल्यांमुळे पाणी निचरा होण्यास येणार्या अडचणी, दरडग्रस्त भाग आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती लक्षात घेवून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आमदार शेखर निकम हे सोमवार दि. २६ मे रोजी अधिकार्यांसमवेत दिवसभर शहराचा पाहणी दौरा करणार आहेत. सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरू होणार्या या दौर्यात शहरातील एकूण १९ ठिकाणे निवडण्यात आली असून या प्रत्येक ठिकाणी ते भेट देणार आहेत.www.konkantoday.com