
खेडमध्ये एका महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या तरूणाचा आकस्मिक मृत्यू.
खेड शहरातील एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्या २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. सुरज प्रभू आंधळे (सध्या रा. झमझम अपार्टमेंट, खेड, मूळ गाव मांजरी-पुणे) असे मृत तरूणाचे नाव आहे. भाड्याच्या खोलीत तो जेवण करून झोपला होता. त्याला श्वास घेण्याचा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.www.konkantoday.com