
वाहतूक कोंडीमुळे मंत्री ना. योगेश कदम यांनी केला मुंबई मेट्रोने प्रवास
मुंबईत अचानक सुरू झालेल्या पावसामुळे दापोली शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे वेळ वाचविण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास केला.
या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व सुविधा याबाबत विचारपूस केली. मुंबई मेट्रोचे नियोजन हे सुरक्षित, वेळेवर आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, भविष्यात सर्व मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना निश्चितपणे मोठा फायदा होईल, असा विश्वास ना. योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
www.konkantoday.com