
कुडाळचे सायकलपटू कुडाळ ते कन्याकुमारी असा 1320 किमीचा सायकल प्रवास करणार
निरोगी आरोग्याच्या जनजागृतीसाठी कुडाळ येथील रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर हे कुडाळ ते कन्याकुमारी सायकल राईड करणार आहेत.रोटरी क्लब ऑफ कुडाळ व सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या संस्थांच्या वतीने याचे आयोजन केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने दररोज थोडावेळ स्वतः साठी काढून सायकलिंग करावे, हा संदेश घेऊन कुडाळचे सायकलपटू रूपेश, शिवप्रसाद व अमित हे कुडाळ ते कन्याकुमारी असा 1320 किमीचा सायकल प्रवास करणार आहेत. रुपेश याने याआधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ‘सायकलिंग सुपर रेन्डोनिअर’ हा बहुमान दोनवेळा मिळविला आहे. शिवप्रसाद याचे कपड्यांचे दुकान असून, सायकलिंगमध्ये त्याने सुपर रेन्डोनिअर हा बहुमान पटकावला आहे. तर अमित हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे. या सायकल राईडचा शुभारंभ सोमवारी (दि 18) सायं.4 वाजाता कुडाळ बसस्थानकासमोरून होणार आहे.
www.konkantoday.com