
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी च्या डिप्लोमा इन टेक्स्टाइल ॲन्ड फॅशन डिझाइनींग चा निकाल १००%….
.महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे, महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी हे एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न आहे. 2023 पासून सुरू झालेल्या डिप्लोमा इन टेक्सटाइल अँड फॅशन डिझायनिंग कोर्स चा निकाल १०० % लागला आहे. या कोर्सची पहिली बॅच उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
द्वितीय वर्षामध्ये प्रथम क्रमांक कु. गीतांजली बडबे ७२ %, द्वितीय क्रमांक कु विरश्री सुर्वे ७१. ४७% आणि तृतीय क्रमांक लता राऊत ६९.३३% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक कु. सारिका गवाणकर ७९.७८%, द्वितीय क्रमांक कु. शृंखला आडवीरकर ७५.११%, तृतीय क्रमांक कु. श्रद्धा चव्हाण ७१.५६% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.
DTFD म्हणजेच Diploma in Textile & Fashion designing या कोर्समध्ये विद्यार्थिनींना बेसिक डिझाईनिंग, डाईंग अँड प्रिंटिंग, एम्ब्रोईडरी आणि कॅलिग्राफी या विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान व प्रशिक्षण दिले गेले होते. या अभ्यासक्रमासोबत विद्यार्थिनींना संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी इंग्लिश विषयाचे प्रशिक्षण दिले गेले होते.
तसेच विद्यार्थिनींना कोल्हापूर येथे रेमंड सारख्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री विझिट करण्याची संधी मिळाली. या विद्यार्थिनी रत्नागिरी येथे विविध ठिकाणी, ३ ते ४ फॅशन शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींना कोल्हापूर येथे गारमेंट व टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि बुटीक मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्षऻ तसेच रत्नागिरी प्रकल्प अध्यक्षऻ श्रीमती. विद्याताई कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंत देसाई, प्राचार्या. स्नेहा कोतवडेकर, प्रकल्प समन्वय श्री. स्वप्निल सावंत आणि संस्थेचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.