पोमेंडी खुर्द (ता. रत्नागिरी) गावात दरड कोसळून तीन जण जखमी.

रत्नागिरी : जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरा नजीकच्या पोमेंडी खुर्द गावात दरड कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले.

यात दोन वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहेजखमी झालेल्यांमध्ये आशा अमर राठोड (वय ४२), मोहन किसन राठोड (वय २२) आणि रोहन जाधव (वय १७) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण तसेच तलाठी वैभव शेंडे यांनी धाव घेतली. जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.दरम्यान, पावसामुळे दरड कोसळ्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button