
राज्यात २० नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा तसेच ८१ नवीन तालुके आणि तहसील कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे
राज्यात २० नवीन जिल्ह्यांची निर्मितीचा तसेच ८१ नवीन तालुके आणि तहसील कार्यालयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे. २०२१ ची जनगणना, भौगोलिक स्थिती आणि सीमांकन झाल्यानंतरच जिथे गरज आहे तिथे जिल्हा व तालुक्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.




