
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली.डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तातडीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दरड हटवण्याचे काम सुरू केले. युद्धपातळीवर काम करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे