
श्रद्धाभावामुळे काेकणात गुन्हेगारी कमी, माजी जिल्हा पाेलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी
काेकणात गुन्हेगारी कमी असण्याचे कारण म्हणजे येथील लाेकांच्या मनामध्ये असणारा श्रद्धाभाव आहे. ही संस्कृती कायम राखली पाहिजे. पशुपक्षी, जनावरांबद्दलही भूतदया येथे दिसून आली. देवराया शतकाेत्तर टिकून आहेत, श्रद्धाभाव म्हणून निसर्ग टिकून असल्याचे उद्गार मावळते पाेलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले. पाेलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे बदली झाल्यामुळे साेमवारी त्यांना रत्नागिरी जिल्हा पाेलीस दलार्ते निराेप देण्यात आला. यावेळी रत्नागिरीतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित हाेते. पाेलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलेल्या कामाचे यावेळी सर्वांनीच काैतुक केले.
शांत, संयमी व्यक्तीमत्व म्हणून कुलकर्णी यांनी आपली ओळख निर्माण केली हाेती. सामाजिक समताेल ढासळू नये यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे मत चिपळूण येथील निराधार ाऊंडेशनचे नाझीम अफवारे यांनी व्यक्त केले. रात्री अपरात्री केव्हाही ाेन केला तरी पाेलीस अधिक्षक कुलकर्णी यांनी ाेन उचलला नाही असे कधी झाले नाही. सर्वसामान्य व्यक्तींसाठीही त्यांनी आपल्या कार्यालयाचे दरवाजे खुले ठेवले हाेते. त्यामुळे जिल्हाभरामधून थेट त्यांना भेटण्यासाठी तक्रारदार येत असत आणि त्यांचे समाधानही हाेत असे, असेही अनेक मान्यवरांनी भावना व्यक्त करताना सांगितले. पाेलीस अधिक्षकांनी नेहमीच पाॅझिटीव्ह अॅप्राेचने काम केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कुणा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर न रागवता किंवा कर्मचाèयांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्याकडून चांगले कसे काम करुन घेता येईल हे त्यांनी पाहिले, वेगळ्या पद्धतीने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडून पाहाता येते अशा भावना अप्पर पाेलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केली. अनेक गाेष्टी त्यांच्याकडून शिकता आल्याचेही जयश्री गायकवाड यांनी सांगितले.www.konkantoday.com