
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गटारांची जबाबदारी निश्चित करुन तातडीने उपाययोजना करा : शौकतभाई मुकादम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गलगत सिमेंट कॉंक्रिटची जी गटारे बांधण्यात आली आहेत, त्यामध्ये रस्ता खाली व गटाराची उंची वर आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारामध्ये जाणार नाही व ते रस्त्यावर साठून दुर्देवाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहादूरशेख नाका ते पाग नाका हा भाग नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येतो. या हद्दीमध्ये हायवेने गटारे बांधली आहेत ती निकृष्ट दर्जाची असल्यामुळे ती आतमध्ये कोसळून गटारामध्येच गटाराचा भराव झाला आहे. गटारे पावसाळ्यापूर्वी साफ कोणी करायची? नगर परिषदेने की हायवेने, ही जबाबदारी वरिष्ठ अधिकार्यांनी फिक्स करावी. चालढकल करुन एकमेकांकडे बोट दाखवू नका. भविष्यात नागरिकांना वरील संकटांना सामोरे जावे लागेल व दुर्देवाने अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी उपस्थित केला आहे. www.konkantoday.com