
माेबाईलच्या आधारे शुटींग अवैध मासेमारीच्या तक्रारी दिशाभूल करणाèया असल्याचे खात्याचे म्हणणे.
पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर पर्ससीननेट मासेमारी करणाèया बहुसंख्य नाैकांची मासेमारी बंद झाली आहे. मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असताना एलईडी आणि राज्याच्या सागरी क्षेत्रात अवैध मासेमारी सुरु असल्याच्या तक्रारी हाेत हाेत्या. या पार्श्वभूमीवर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या रामभद्रा गस्ती नाैकेने प्रत्येक वेळी त्या ठिकाणी जावून पाहाणी केली असता अशी काेणतीही मासेमारी हाेत असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे या तक्रारी दिशाभूल करणाèया ठरल्या आहेत. पावसाळी मासेमारी बंदी 31 मे पासून सुरु हाेत आहे. मे च्या पहिल्या आठवड्यापासूनच पर्ससीननेट मासेमारी नाैका बंदरात शाकारल्या जावू लागल्या आहेत.
बहुसंख्य नाैकांची मासेमारी बंद झाली असतानाही गेल्या काही दिवसांपासून समुद्रातील नाैकांवरील लाईटचे माेबाईलद्वारे चित्रिकरण करून ते मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आयुक्तांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या पथकाला प्रत्येकवेळी कारवाईची सूचना केली. रामभद्रा गस्ती नाैकेची नियमित गस्त सुरु असताना झालेल्या तक्रारीनुसार जशा सूचना आल्या त्या ठिकाणी जाऊन गस्ती नाैकेने पाहाणी केली असता तेथे एलईडी किंवा राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी हाेत नसल्याचे दिसून आले. या बाबतचा गस्ती नाैकेतील जीपीएस पाॅईंट लाेकेशन व चित्रिकरण आयुक्तांना पाठवण्यात आले.www.konkantoday.com