
भीषण अपघात हाेवूनही महामार्ग खात्याला जाग नाही, जगबुडी पुलाच्या हाॅटस्पाॅटवर गर्डरची मलमपट्टी.
मुंबई-गाेवा महामार्गावरील भरणे येथील नवा जगबुडी पूल पुर्वीपासूनच अपघाताच्या दृष्टीने हाॅटस्पाॅट ठरला हाेता. सतत अपघाताची मालिका सुरू असतानाही ठाेस उपाययाेजनांचा अवलंब करण्याची तसदी राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतली नाही. खात्याच्या बेिफकीरपणामुळे कार दुर्घटनेत 6 जणांना हकनाक प्राण गमवावा लागला. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग खाते खडबडून जागे झाले आहे. अपघात राेखण्यासाठी अपघातस्थळी गर्डरची मलमपट्टी करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता रामभराेसे आहे.महामार्गावरील चाैपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास वेगाने झाला असला तरी भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर सातत्याने घडणाèया अपघातामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे.www.konkantoday.com