
जगबुडी पुल अपघात, अधिकाऱ्यांवर सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची वैभव खेडेकर यांची मागणी.
मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी पुलावरील अपघातामध्ये मृत झालेल्या घटनेला जबाबदार काेण? असा सवाल उपस्थित करताना राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून यामध्ये दाेषी अधिकारी यांच्यावर तत्काळ सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून या अपघाताची सखाेल चाैकशी करावी, अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस, माजी नगराध्यक्ष वैभव – खेडेकर यांनी केली.
वैभव खेडेकर यांनी अपघातात घडल्यानंतर काही वेळातच घटनेच्या ठिकाणी मदतकार्यात सहभाग घेवून पाेलीस प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी आपली आक्रमकता आजही कायम असून महामार्गाचे रखडलेल्या कामामुळे आपण अनेक वेळा आंदाेलनात्मक भूमिका घेतली. प्रसंगी प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल व्यक्त करून आपण पुन्हा याच ठिकाणी आंदाेलन करून पुढील अपघात घडू नये यासाठीच पाठपुरावा करणार असल्याचे माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.www.konkantoday.com