
अज्ञात कारखान्याने साेडलेल्या घातक रासायनिक सांडपाण्याने डबक्यात बसलेल्या म्हशी भाजल्या.
खेड तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीमध्ये शारदा लेटेक्स कारखान्याशेजारी घातक रासायनिक सांडपाणी डबक्यात साठले हाेते. या डबक्यात बसलेल्या पाच म्हैशी भाजल्या. त्या म्हैशी रमेश तुकाराम आखाडे यांच्या मालकीच्या हाेत्या. दि. 11 मेला ही घटना घडली. याबाबत या शेतकèयाकडून मिळालेल्या माहितीनुसार औद्याेगिक वसाहतीमधील शारदा लेटेक्स या कारखान्याच्या पूर्वेकडील माेकळ्या जागेत घातक रासायनिक सांडपाणी साचून डबके तयार झाले हाेते. या शेतकèयाकडे एकूण 18 म्हैशी असून दुधाचा व्यवसाय हेच त्याच्या उत्पन्नाचे साधन आहे.
दुधाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतकरी करताे. मात्र कारखानदारांच्या चुकांमुळे त्याचे नुकसान झाले आहे, असे या शेतकऱ्याकडून सांगण्यात आले. घातक रासायनिक सांडपाणी एवढे घातक हाेते की या डबक्यातील पाणी पूर्ण आटल्यावरही जमिनीतून धूर येत हाेता. परिणामी रविवारी पाच म्हशी या डबक्यात बसल्या आणि हाेरपळल्यामुळे सैरावैरा पाळायला लागल्या. त्यातील एक म्हैस शाेधून आणण्यात या शेतकऱ्याला यश आले आहे. परंतु अद्याप चार म्हशी बेपत्ता आहेत. शाेधून आणलेल्या एका म्हैशीवर पशुवैद्य यांच्याकडून उपचार चालू आहेत. याबाबत शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी कारखाना व्यवस्थापनाला विचारले असता, हे रासायनिक सांडपाणी आम्ही साेडलेले नसून इतर काेणीतरी केले असावे असे सांगून हात वर केले. म्हणून या शेतकऱ्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक पाेलीस प्रशासन आणि तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.www.konkantoday.com