संगमेश्वर तालुक्यातील काटवली ग्रामपंचायतीस मिळाली नवीन ओळख.

आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते संगमेश्वर तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त व निर्मलग्राम म्हणून गौरव झालेल्या काटवली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.ग्रामविकासाची खरी ओळख म्हणजे पारदर्शक प्रशासन, सशक्त स्थानिक स्वराज्य आणि सर्वसमावेशक विकास ही आहे. काटवली ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार आणि एकात्मतेचा संदेश हा इतर गावांसाठीही प्रेरणादायक असून नव्या इमारतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि विकासाचा वेग अधिकच वाढेल, याचा मला पूर्ण विश्वास मला असल्याचे प्रतिपादन यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.

ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाले. या पुढील वाटचालीसाठी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी काटवली ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी आमदार शेखरजी निकम, गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button