
रत्नागिरी शहर भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन…
..*रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दि. 31 मे रोजी असून त्यानिमित्त रत्नागिरी भाजपाच्यावतीने व शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे पुरस्कुत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर मर्यादित खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धकांनी दि. 26 मे पर्यंत आपले निबंध जमा करायचे आहेत.
या स्पर्धेसाठी विषयः
1) देशभक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श प्रशासक. 2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान.
नियय व अटी : स्पर्धेत भाग घेवू इच्छूणार्या स्पर्धकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात निंबंध कागदाच्या एका बाजुने लिहावा. निबंधाची शब्द मर्यादा 1000 ते 1200 शब्द असावी, स्पर्धकांनी स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर कागदावर लिहावा,स्पर्धकांनी आपले निबंध दि. 26 मे 2025 पर्यंत ‘अॅप्पल ब्लॉसम, रामआळी,रत्नागिरी’ किंवा भाजप कार्यालय प्रमोद महाजन क्रीडांगण शेजारी आठवडा बाजार रत्नागिरी. या पत्त्यावर पोहोचतील असे पाहावे, स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना कळविण्यात येईल.
पारितोषिक : प्रथम क्रमांकः रोख रक्कम 2222/-, आकर्षक चषक व प्रमाणपत्र.व्दितीय क्रमांकः रोख रक्कम 1555/-, आकर्षक चषक व प्रमाणपत्र.तृतीय क्रमांकः रोख रक्कम 1111/-, आकर्षक चषक व प्रमाणपत्र.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.
पारितोषिक वितरण सोहळा : २७ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजताठिकाण : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय प्रमोद महाजन क्रीडांगण शेजारी येथे होईल या वेळी स्पर्धकांनी आपले कुटुब, नातेवाईक तसेच मित्रपरिवारासह उपस्थित रहावे.. संपर्कः अधिक माहितीसाठी मोबा. 9422432656, 9158511517, (निलेश आखाडे 9860625740) वर संपर्क साधावा.