
नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर जमीन येणार पिकाखाली
रत्नागिरी जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी 6500 शेतकèयांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 2600 हेक्टर पिकाखाली आणण्यात येणार आहे. हे अभियान डाॅ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यासाठी 52 शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात 125 शेतकèयांचा समावेश करण्यात आला आहे. हे नैसर्गिक शेती अभियान विषमुक्त शेतमाल उत्पादन या उद्देशाने राबविण्यात येत आहे. कृषी कृषी श्री विभाग विभाग विभाग व व व आत्मा यांच्या प्रयत्नातून नैसर्गिक शेती अभियान राबविताना विषमुक्त अन्नधान्य उत्पन्नावर भर देण्यात आला आहे. शेतीतील रासायनिक खताचे आराेग्यावर हाेणारे दुष्परिणाम लक्षात घेवून नैसर्गिक शेतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी शेतकèयांचे गट तयार करण्यात येत असून, शेतकèयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.www.konkantoday.com