शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी…

आज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे MBBS चे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी केली.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी यावेळी ढोलवादन,पोवाडा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया, तह,अफजल खान वध यासारखे प्रसंग नाटकाद्वारे सादर केले.त्यानंतर शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले व आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाला शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ.रामानंद, सर्व प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button