
लाेटेतील अपघातांच्या चाैकशीसाठी समिती जिल्हाधिकाèयांसह पाच जणांचा समावेश, उद्याेगमंत्री उदय सामंत यांचे आदेश.
लाेट एमआयडीसीतील उद्याेगांमध्ये झालेल्या अपघाताची सखाेल चाैकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने कमी वेळात याबाबतचा सुस्पष्ट अहवाल सादर करावा, असे आदेश आपण दिले असल्याचे उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितले.रविवारी लाेटे औद्याेगिक वसाहतीत लासा कंपनीत भीषण आग लागून कंपनी जळून खाक झाली तर अॅक्रिला ऑरगॅनिकमध्ये रिअॅक्टरचा स्ाेट झाला. एकाच दिवशी दाेन अपघात झाल्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल ना. उदय सामंत यांनी घेतली असून अपघात कंपनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झाले आहे का? याची चाैकशी केली जाईल. व्यवस्थापन दाेषी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा ना. सामंत यांनी दिला आहे.www.konkantoday.com