
न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जूनमध्ये हाेणार.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचीबदली प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे सुरू झाली आहे. इतर जिल्ह्यातील काही शिक्षक न्यायालयात गेल्याने बदली प्रक्रिया थांबली हाेती. मात्र, नवीन संचमान्यतेला न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांसाठी जुन्या संचमान्यतेनुसार रिक्त पदांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जून महिन्यात शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या सुरू झालेल्या प्रक्रियेनुसार बदली पाेर्टलवर भरलेली माहिती दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अवघड क्षेत्रातून बाहेर पडण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांना यानिमित्ताने संधी मिळाली आहे.www.konkantoday.com