
नव्या पूररेषेचा अहवाल न. प., नागरिकांना विश्वासात घेऊनच तयार करा : आ. किरण सामंत यांनी दिल्या सूचना
लघुपाटबंधारे विभागाने साधारण सन 2021 च्या दरम्यान राजापूर शहरासाठी परस्पर आखलेली नवीन पूररेषा व यंदा पुन्हा चिन्हांकन करून त्यावर शिक्कामाेर्तबाद्वारे पाठवण्यात येणारा अहवाल हा नागरिकांना विश्वासात घेऊनच पाठविण्यात यावा, अशा सक्त सूचना आमदार किरण सामंत यांनी संबंधित अधिकारीवर्गाला साेमवारच्या बैठकीत दिल्या.
जाेडीलाच राजापूर शहरातील नाले, गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करण्यात अशा सूचनादेखिल त्यांनी राजापूर नगर परिषदेतील प्रशासकीय व्यवस्थापनाला दिल्या. आगामी पावसाळी हंगामातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून साेमवारी अधिकाèयांची एक बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या वेळी उपस्थित अधिकाèयांना सूचना देताना पावसाळ्यात तालुक्यातील नागरिकाना त्रास हाेऊ नये याची खबरदारी घेण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.www.konkantoday.com