
जिल्ह्यात लाडकी बहीणचे एकही बनावट खाते नाही, मात्र 7 हजार 753 महिलांना लाभ नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण याेजनेसाठी 100 हून अधिक बनावट खाती खाेलण्यात आल्याचे मुंबईमध्ये समाेर आले आहे. अशा बनावट खात्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर पडताळणी माेहीम हाती घेण्यात आली हाेती. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात एकही बनावट खाते आढळून आले नसल्याचे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून कळवण्यात आले आहे. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त यादीनुसार 7 हजार 753 महिलांना लाभ आता बंद करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.www.konkantoday.com