
अमेरिकेने आंब्याची जहाजे राेखली, देशातील निर्यातदारांचे सुमारे 4.28 काेटी रुपयांचे नुकसान.
भारतातून निर्यात केलेले आंबे अमेरिकेने नाकारल्याने देशातील निर्यातदारांना सुमारे 4.28 काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबा हंगामात देवगड, रत्नागिरी येथील बागायतदारांसह निर्यातदारांना माेठा फटका बसला आहे. आंबा निर्यातीत अमेरिका ही सर्वात माेठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. त्यांनी ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाचा फटका आंबा निर्यातीवर झाला आहे. निर्यात करताना कागदपत्रांच्या प्रक्रियेत त्रुटी झाल्याचा आराेप करत अमेरिकन अधिकाèयांनी पंधराहून अधिक मालवाहू जहाजे राेखली.
लाॅस एंजेलिस, सॅन ्रान्सिस्काे, अटलांटा यां सारख्या विमानतळांवर माल राेखला गेल्याने निर्यातदारांना आंबे तिथेच साेडावे लागले. कारण हा माल परत भारतात आणण्यासाठी पुन्हा पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे नुकसान वाढेल. फळांमधील किडे मारण्यासाठी आणि फळांचे आयुष्य वाढवण्यासाठी केल्या जाणाèया इरेडिएशन प्रक्रियेतील कागदपत्रांमधील तावतीमुळे आंबे नाकारण्यात आले. काळजीपूर्वक कमी प्रमाणात रेडिएशन वापरून ही प्रक्रिया केली जाते. 8 आणि 9 मे राेजी मुंबईत हे आंबे इरेडिएशन प्रक्रियेतून गेले हाेते असा अहवाल आहे.www.konkantoday.com