
करोना विषाणूमुळे बाधित राज्यातून आलेल्या लोकांवर करडी नजर-जिल्हा आरोग्य अधिकारी
चीनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूमुळे न्युमोनियाचे झालेले रुग्ण भारतात आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासन सतर्क झाले असून रत्नागिरी जिल्हा परिषदेनेही चीनमधून आलेल्या किंवा करोना विषाणूमुळे बाधित राज्यातून आलेल्या लोकांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या आहेत.
करोनाशी मिळत्याजुळत्या आजारी रुग्णांच्या नोंदी प्रत्येक दिवशी घेण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
www.konkantoday.com




