
ठाकरे शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांची नियुक्ती जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसंदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना, पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), सुरेंद्रनाथ (बाळ) माने (रत्नागिरी-कोकण) यांना उपनेतेपदी संधी देण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात आली.गुलाबराव वाघ यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा) व नंदुरबार जिह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे माजी आमदार बाळ माने यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानी रत्नागिरी मतदारसंघातून विद्यमान पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली होती त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता मात्र आता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे