
पालकमंत्री उदय सामंत यांनी शड्डू ठाेकला, खेळाडूंवरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र कबड्डी असाेसिएशनची निवडणूक लढविण्याचे संकेत
लाल मातीतील कबड्डी खेळ हा स्थानिकांपुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करणे आवश्यक आहे. रत्नागिरीसह काेकणातील खेळाडूंवर राज्यस्तरावर अन्याय हाेताे हे आपण गेली तीन वर्ष पाहिले आहे. येथील खेळाडूंवर हाेणारा अन्याय दूर करण्यासाठी आपल्या सर्वांना महाराष्ट्र कबड्डी असाेसिएशनची निवडणूक लढावी लागेल. यासाठी मी स्वतः पुढाकार घेवून निवडणूक लढवणार असल्याची घाेषणा जिल्हा कबड्डी असाेसिएशनचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केली.
तालुक्यातील नांदिवडे येथील श्री चंडिकादेवी नांदिवडे ग्रामस्थ आयाेजित, बाबूशेठ पाटील मित्रमंडळ पुरस्कृत पुरूष व महिला गटांच्या कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद उफर् बाबू पाटील, माजी जि.प. सभापती साै. ऋतुजा जाधव, माजी सभापती मेघना पाष्टे, शाखाप्रमुख साै. शिरधनकर, साै. काव्या शिरधनकर, प्रमाेद घाडगे, जयवंत आढाव, संदीप शिरधनकर, विभागप्रमुख बाबय कल्याणकर, बाबय फटकळे, अक्षय मेनये, कमलेश बापट, सुयाेग बिवलकर आदी मान्यवर उपस्थित हाेते.www.konkantoday.com