
गर्दीचा फायदा घेत लांजा बस स्थानकात महिलेच्या पर्समधील 82 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला
बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र व रोख रक्कम असा ८२ हजार ६४३ रुपयांचा ऐवज चोरट्याने पळविला. लांजा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) दुपारी साडेबाराच्या सुमारास लांजा बसस्थानक येथून व्हेळ गावी जाणाऱ्या लांजा झर्ये गाडीमध्ये चढत असताना घडली.फिर्यादी महिला या व्हेळ गावी जाण्यासाठी लांजा झर्ये गाडीत चढत असताना त्यांनी खांद्याला लावलेल्या हॅडबॅग पर्समधील ठेवलेल्या पाकीटातील मंगळसुत्र व रोख रक्कम असा ८२ हजार ६४३ रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.