
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणि असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना शनिवार 17 मे रोजी सकाळी 11.30 ते 12.45 वा. कालावधीत घडली आहे.याप्रकरणी महेंद्र गंगाधर सावंत (56,रा.सुयोग सोसायटी कुवारबाव,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी ते कुटुंबियांसह बाहेर गेले असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाचे कुलुप कडीसहित उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटातून रोख 2 लाख रुपये आणि सोन्याचे ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.