
डुकराने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या चिपळूण येथील जेके फाईल्स कंपनीतील कर्मचाऱ्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू.
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे कंपनीत कामासाठी जाणाऱ्या आनंद लक्ष्मण घाणेकर ( ४०) या कर्मचाऱ्याला रस्त्यात डुकराने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान शनिवार 17 मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ते चिपळूण तालुक्यातील खडपोली तळेवाडी येथील रहिवासी असून जे. के. फाईल्स कंपनीत कार्यरत होते. ही घटना 13 मे रोजी घडली होती.आनंद घाणेकर हे १३ मे रोजी रात्रीच्या ड्युटी साठी दुचाकीवरून कंपनीकडे जात होते. त्याचवेळी अचानक धावत आलेल्या एका डुक्कराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. सुरुवातीला त्यांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु अधिक उपचारांसाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले.पुण्यात त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने शनिवारी दुपारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच जे. के. फाईल्स कंपनीतील कामगार वर्गाने शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.