
रत्नागिरी आठवडा बाजारात शौचालयाच्या बाजूला खाटेवर झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यावर अज्ञात कडून प्रहार
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील वृद्ध जखमी अवस्थेत आढळला. उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मनमोहन शंकर मुसळे ( ८३, रा.आठवडा बाजार, सुलभ शौचालयाच्या बाजूला, रत्नागिरी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी रात्री 1 वा.सुमारास घडली. मनमोहन मुसळे हे शौचालयाच्या बाजूला खाटेवर झोपलेले असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार केला. सकाळी सहाच्या सुमारास कदम हे सुलभ शौचालय उघडण्यासाठी गेले असता त्यांना मुसळे हे जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
www.konkantoday.com