
राज्यातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा
उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ सध्ये या कालावधीत २३.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.www.konkantoday.com[18/05, 9:18 AM] Sudesh Sir: विमा कंपन्यांच्या धोरणांचा शेतकर्यांना फटका, शेतकर्यांनी घेतली शासनाकडे धावअवकाळी पाऊस व वाढती उष्णता यामुळे बदलणार्या हवामानाचा सातत्याने आंबा पिकावर परिणाम होऊन आंब्याचे नुकसान होते. २०२३-२४मध्ये ३२ हजार शेतकर्यांना ७९ कोटी १८ लाखाची नुकसान भरपाई अदा करण्यात आली असली तरी मागील वर्षी विमा कं पन्यांच्या धोरणांचा फटका जवळपास सव्वाचार हजार शेतकर्यांना बसला. याविरोधात शेतकर्यांनी शासनाकडे धाव घेतली असून, सात कोटीच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील वर्षी आंबा, काजू पिकांसाठी शेतकर्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळिपक विमा योजना आंबिया बहार योजनेंतर्गत हजारो शेतकर्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ३६ हजार ८४१ शेतक-यांनी या योजनेत सहभाग घेत २०७३३.३० हेक्टरवरील पिक संरक्षित केले होते. या योजनेमध्ये शेतकर्यांना २४ कोटी ५ लाख ५३ हजार रुपयांचा हप्ता भरला होता तर उर्वरीत शासनाकडून हप्ता भरण्यात आला. एकूण १०८ कोटी ५४ लाख ८९ हजार रुपयांचा हप्ता विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला होता.www.konkantoday.com