जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धाएसव्हीजेसीटी क्रीडा संकुल येथे संपन्न१४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात एस. पी. एम इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूणला विजेतेपद


रत्नागिरी, दि. 15 ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, अंतर्गत जिल्हा फूटबॉल संघटना यांच्या तांत्रिक सहकार्याने एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल चिपळूण येथे जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे १० ते १२ सप्टेंबर कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींमध्ये एकूण २७ संघ असे एकूण ४८६ खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे दिनेश पुजारी, एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा फूटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रसाद परांजपे, क्रीडा शिक्षक अजित दवडे, कुणाल चव्हाण, समीर यादव, आशिष कानापडे आदी उपस्थित होते.
१४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण संघाने रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर सेंट थॉमस रत्नागिरी संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. १४ वर्षाखालील मुलींमध्ये सेंटथॉमस रत्नागिरी संघाने कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, संगमेश्वर संघाविरुद्ध अंतिम सामना जिंकला. एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. १७वर्षा खालील मुलांच्या वयोगटामध्ये एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण व रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड यांच्या मधील अंतिम सामन्यात एस. पी. एम इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण या संघाने अंतिम विजेते पद मिळविले तसेच सेंटथॉमस रत्नागिरी संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात एसव्हीजेसीटी इंग्लिश मिडियम स्कूल संघाने सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट रत्नागिरी संघाविरुद्ध विजेतेपद पटकाविले आणि पी. एस. बने इंटरनॅशनल, संगमेश्वर संघ तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी आणि डी. बी. जे महाविद्यालय चिपळूण यांमध्ये झालेल्या अत्यंत सामन्यामध्ये अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या संघाने विजेतेपद पटकावले. कै. प्र. ग. कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर, खेड संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी संघ सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले आणि उपविजेतेपद ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड संघाने मिळवले. तृतीय स्थान गोविंदराव निकम माध्य व उच्च माध्य विद्यालय, सावर्डे संघाने पटकाविले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन मांडवकर क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा कार्यालय यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button