
चिपळूण तालुक्यातील कालूस्ते-खोपड पूल पूर्ण; उर्वरित कामे अपूर्ण
कोंढे-करंबवणे मार्गावर कालुस्ते-खोपड पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटायला आले तरीही उर्वरीत कामे ठेकेदारांने अर्धवट ठेवली आहेत. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. अशातच पूल बांधकामावेळी नदीत भराव टाकून काढलेला पर्यायी रस्ता अजूनही तसाच ठेवलेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे डांबरीकरणही करण्यात आले नसल्याने बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. चिपळूण तालुक्याच्या खाडीपट्टा विभागात कोंढे करंबवणे हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर कोंढे, शिरळ, खोपड, कालुस्ते, मिले, केतकी, करंबवणे आदी गावे येत असून या रस्त्यावरुन धामेली मार्गे कापरे, बिवली, मालदोली, ग्राग्रई आदी गावांमध्ये वाहतूक होत असते. त्यामुळे खाडीपट्ट्यातील दळणवळणाच्यादृष्टीने हा रस्ता महत्वाचा आहे. याच मार्गावरील खोपड-कालुस्ते नदीवरील पूल जुना झाल्याने आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पातून एक कोटीहून अधिक निधी या पुलाच्या पुनर्बाधणासाठी उपलब्ध केला.www.konkantoday.com