
कृषि सहाय्यकांचे काम बंद आंदोलन अखेर सुरू, खरीप हंगामाच्या कामकाजावर होणार मोठा परिणाम.
कृषि विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषि सहाय्यकांच्या पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषि सहाय्यक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. हे आंदोलन विविध टप्प्यात करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय साळुंके यांनी सांगितले. त्यानुसार दि. ५ मे २०२५ पासून काळ्याफिती लावून कृषि सहाय्यक संघटनेने कामकाजाला सुरुवात केली तर गुरूवार दि. १५ मे २०२५ पासून संपूर्ण कामकाजावर कृषि सहाय्यकांनी बहिष्कार टाकून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सध्या कृषि सहाय्यकांचे एकूण ११ हजार ५२७ पदे अस्तित्वात असून कृषि पर्यवेक्षकांची ७०० पदे मंजूर आहेत. त्यामुळे कृषि सहाय्यकांना सेवेचे २० ते २५ वर्षे झाल्यानंतर ही पदोन्नती मिळत नाही.www.konkantoday.com