
विद्या येमुळ या युवतीच्या प्रसंगावधानाने महिलेचा जीव वाचला.
विद्या येमुळ या युवतीच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना महिनाभरापूर्वी लांजा तालुक्यातील भडे येथे घडली होती. या युवतीच्या धाडसामुळे होणारा अनर्थ टळला. भडे गावात एक व्यक्ती आपल्या पत्नीला रात्रीच्या वेळी फरशीने मारत होता. परंतु त्यावेळी जवळपास असलेल्यांपैकी एकही व्यक्ती त्या महिलेला वाचविण्यासाठी पुढे गेली नाही. अशातच संबंधित परिसरात राहणारी विद्या येमुळ ही तिची दहावीची परीक्षा सुरू असल्याने अभ्यास करत बसली होती. त्यावेळी तिला महिलेचा आरडाओरडा ऐकू आला. त्यामुळे तिने लक्ष दिल्यानंतर एक व्यक्ती आपल्या पत्नीला मारत असल्याचे तिच्या लक्षात आले. विद्या ही मारहाण करत असलेल्या संबंधित व्यक्तीच्या घराजवळ गेल्यानंतर तिने सुरू असलेला प्रकार बघितला. तसेच एवढा मारहाणीचा प्रकार होत असताना कोणीही पुढे येत नसल्याने विद्याने प्रसंगावधान दाखवत अगोदर मारहाण होत असलेल्या घराला बाहेरून कडी लावून घेतली, त्यांनतर विद्याने भडे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क केला. यानंतर ११२ नंबरवर प्रकार सांगितला. ११२ वर संपर्क केल्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिसांचे एक पथक तत्काळ भडे येथे रवाना झाले. येथे पोहोचताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आणि अनर्थ टळला.www.konkantoday.com