
१९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील एका पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.
१९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील एका पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी १४ मे रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील १९ वर्षे पीडित तरुणी ही बुधवारी रात्री गावातील क्रिकेटची मॅच बघण्यासाठी आपल्या कुटुंबासह गेली होती. ती आपल्या भावाच्या मित्राबरोबर मोबाईलवर बोलत असताना संबंधित गावचा पोलीस पाटील हा त्या ठिकाणी आला. तसेच तिचा हात धरून काळोखात ओढत नेत तिचा विनयभंग केला.याप्रकरणी या १९ वर्षीय तरुणीने लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी २७ वर्षीय पोलीस पाटलावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.