
रत्नागिरी विमानतळावरील प्रवासी वाहतूक टर्मिनलच्या कामाने वेग घेतला.
गेली अनेक वर्ष रत्नागिरी विमानतळ सुरु होण्याबाबत वारंवार घोषणा होत होत्या. मात्र रत्नागिरीचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. जमीन संपादनापासून पुढाकार घेत, राज्य शासनाकडूनही १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन घेतला. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक टर्मिनलच्या कामानेही वेग घेतला असून वर्षभरात रत्नागिरी विमानतळावरुन उड्डाण करण्याची आशा आहे.पूर्वी रत्नागिरी विमानतळावरुन विमानवाहतूक सुरु होती. मात्र ती बंद झाली. अनेक वर्ष प्रवासी वाहतूक बंद राहिल्यानंतर काही वर्षापूर्वी हे विमानतळ केंद्र शासनाच्या संरक्षक विभागाने ताब्यात घेत, तटरक्षक दलाच्या हाती सोपवले.www.konkantoday.com