भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक असणाऱ्या जमीन मालकांनी करावयाचे अर्ज.

रत्नागिरी, दि. 17 ): भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटूंबाना 4 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 2 एकर बागायती (ओलिताखालील) जमिन देण्याबाबत प्रस्तावित आहे. या योजना आदिवासी विकास विभागाच्या 28 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये 100 टक्के अनुदानित आहे.

त्याचप्रमाणे सदरील शासन निर्णयानुसार जमिन विक्रीसाठी इच्छुक जमिन मालकांने खालील प्रमाणे कागदपत्र सादर करावेत. अर्जदाराचा जमीन विक्री करणारा/ जमीन मालक विहित नमुन्यांतील अर्ज, शेतजमिनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र व सातबारा उत्तारा, संबंधित परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्यास मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, जिल्हा समितीपुढे सादर केलेल्या प्रस्तावातील शेत जमिन समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही याची शेत जमिन विक्री करणा-या शेतक-यास जाणीव असल्याबाबतचे घोषणापत्र व जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणताही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत व सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरु नसल्याबाबत विक्री प्रस्तावातील जमिन कुठेही गहाण नसल्याबाबतचे संबंधित शेतजमिन विक्री करणा-या जमिन मालकाचे शपथपत्र, जमिन विक्रीच्या अर्जावर शेतजमिन विक्री करणा-या व्यक्तीशिवाय कुटूंबातील दोन व्यक्तीच्या (उदा. सख्खे भाऊ, पत्नी, मुले. इ.) स्वाक्षरी असाव्यात व त्यांचे विक्रीबाबत ना-हरकत प्रमाणपत्र.वरील प्रमाणे जमिन विक्रीस काढलेल्या मालकाने कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवास विकास प्रकल्प, पेण रॉयल ग्रॅन्डीअर बिल्डींग, पहिला मजला, रामवाडी पेण जि. रायगड या कार्यालयात 30 जुन 2025 पर्य कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी ०२१४३-२५२५१९ वर संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ता. पेण जि. रायगड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button