
’हायटेक’ बसस्थानकावर गाड्या वळण्यासाठी दगडाची रांग, प्रवेशद्वारावरच हातगाड्यांचे अतिक्रमण.
नुकतेच उदघाटन करण्यात आलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक येथे बसखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बसस्थानकात येणार्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची दखल घेत एसटी प्रशासनाकडून एसटी बस आत येणार्या ठिकाणी दगड लावून प्रवाशांची सुरक्षा केली असल्याचे दाखविले आहे. या सर्व प्रकाराने बसस्थानक परिसरातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.अनेक वर्ष निर्माणाधीन असलेल्या एसटी स्थानकाचे रविवारी थाटात उद्घाटन करण्यात आले होते. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या बसस्थानकाची भव्यता पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला होता.
मंगळवारी वृद्धाचा बसखाली चिरडून मृत्यू झाल्याने प्रवाशांना उत्साह दोन दिवसांतच मावळला. तसेच नव्या बसस्थानकाला गालबोट लागले कमलाकर चव्हाण असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. चव्हाण हे बसस्थानकात प्रवेश करत असताना आतमध्ये येणार्या एसटीने त्यांना चिरडले. एसटी प्रशासनाने येथे करण्यात येणार्या खासगी वाहनांच्या पार्किंगवर खापर फोडले. त्यानुसार येथे एक बॅनर लावण्यात आला असून खासगी वाहनांना प्रवेश नसल्याचे लिहिण्यात आले आहे. बसचालकांना बस जपून चालविण्याचा सल्ला देण्यात आला, मात्र पार्किंग होवू नये म्हणून एसटी प्रशासनाकडून चिर्याचे दगड लावले आहेत. सुमारे १७ कोटीचा खर्च करुन बांधलेल्या या बसस्थानकावर ठोस उपाययोजना केली जात नसल्याने प्रवासीवर्गात नाराजी आहे. दरम्याने प्रवेशद्वाराशीच आता हातगाड्यांनी अतिक्रमण केले असून या हातगाड्यांवर पुढे होणार्या गर्दीमुळे ही वाहतूक पुढेही धोकादायक ठरणार आहे. यामुळे या ठिकाणी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.www.konkantoday.com