संजय राऊत यांनी दाखल केलेले मानहानीचे प्रकरणात नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट


शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्याविरुद्ध गुरुवारी जामीनपात्र वॉरंट काढले.राणे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. तथापि, गुरूवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी राणे हे न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे, माझगाव न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढले. तसेच, प्रकरणाची सुनावणी २ जून रोजी ठेवताना त्यावेळी राणे यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

राणे यांनी २ जून रोजी न्यायालयात उपस्थित राहून वॉरंट रद्द करता येईल.राणेंविरुद्ध एका महिन्यात न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीनपात्र वॉरंट बजावले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button