
रत्नागिरी शहरातील जुना माळनाका येथे आधुनिक व्यापारी संकुल उभे राहणार.
रत्नागिरी नगर परिषदेने आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमानुसार माळनाका येथे जुन्या व्यायामशाळेच्या जागेवर नव्याने आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी येथे असलेल्या जुनी इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. येथील प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.नगर परिषदेमार्फत शहरात तारांगण, मल्टीमिडीया शो आणि पेठ किल्ल्यातील शिवसृष्टीसारख्या प्रकल्प साकारण्यात येऊन या प्रकल्पांमधून उत्पन्न सुरू झाले आहे. आता माळनाका येथील जागेच्या विकासातून भाड्याच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी माळनाका येथील रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची जागा सध्या व्यायामशाळेच्या आवारात आहे. या ठिकाणी काही दुकानांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेकराराने जागा देण्यात आल्या होत्या. आता या जागेवर नवीन व्यायामशाळेसह व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.माळनाका येथील जागेचा विकास पूर्ण झाल्यानंतर व्यापारी संकुलातील दुकाने आणि इतर सुविधांच्या भाड्यामधून नगर परिषदेला नियमित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.www.konkantoday.com