रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गांजुर्डा येथे घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात महिलेने रोख रक्कमेसह ५३ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची तक्रार दाखल.

रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गांजुर्डा येथे घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात महिलेने रोख रक्कमेसह ५३ हजार रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ते १२ मे रात्री साडेनऊच्या सुमारास गांजुर्डा मशीद येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहिद्दीन अमीर हमजा सुंबड (वय ४२, रा. शिरगाव-गांजुर्डा मशीदीच्या मागे, रत्नागिरी) यांच्या घरात एका महिलेने घरात शिरुन घरातील लोखंडी कपाट कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून कपाटीतील ४० हजाराचा एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस व १३ हजार रोख रक्कम असा ५३ हजारावर डल्ला मारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button