
रत्नागिरीकराना सध्या तरी मोठी पाणी कपात नाही.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठी १० जूनपर्यत पुरेल इतका आहे. मात्र उच्चतम तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. नागरिकांनी गैरसोय होऊ नये यासाठी सध्या तरी आठवड्यानून एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरु असल्याचे रत्नागिरी पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.शहराला दररोज १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज दीड तास पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.
मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेगळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला करण्यात येत होता. मात्र यावर्षी धराणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध साठा पाहून कपातीचा निर्णय घेण्यात येईल, मात्र कपात मोठ्या प्रमाणावर केली जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.